दर्जात्मक शिक्षणाची चळवळ – जमिनीवरील आव्हाने
दर्जात्मक शिक्षणासाठी अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. अनेक ठिकाणी यावर काम होत आहे, पैसे खर्च होत आहेत, पण अपेक्षित दिशेने प्रगती मात्र झालेली दिसत नाही. दर्जात्मक शिक्षण कसे असावे हे अनेकांनी आपापल्या परीनं समजून घेण्याचा प्रयत्नदेखील झालेला दिसतो. परंतु तरी, शिक्षणाला सर्वसमावेशक बनवण्याचे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम प्रत्यक्षात उतरवणे आपल्याला इतके आव्हानात्मक का वाटते …